पुणे – शहरातील विविध भागातील मंदीरातून दानपेटी चोरीला जाण्याचे सत्र कायम असल्याचे दिसून आले आहे. चोरट्यांनी गुरूवार पेठेतील श्री नाकोडा भैरव जैन मंदीरातून दान पेटीच चोरून नेली आहे. त्यामध्ये भाविकांनी केलेल्या दानासह १ लाख ५३ हजारांचा ऐवज असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ही घटना १६ ते १७ मे कालावधीत घडली आहे. मंदीराचे चेअरमन यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार पेठेतील श्री आदेश्वर महाराज मंदीर ट्रस्टचे फिर्यादी चेअरमन आहेत. लॉकडाउनमुळे श्री नाकोडा भैरव जैन मंदीर बंद होते. १६ ते १७ मे कालावधीत चोरट्यांनी मंदीराचे कुलूप तोडून भाविकांनी दान केलेले ३ हजार रूपये आणि दानपेटी असा मिळून १ लाख ५३ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सुशील बोबडे यांनी दिली आहे.