पुणे – दहशत निर्माण करण्याच्या हेतूने तडीपार गुन्हेगाराने त्याच्या चार ते पाच साथीदारांना सोबत घेऊन एका तरुणाला तलवारीने मारहाण करत परिसरातील वाहनांची तोडफोड केली. ही घटना सोमवारी रात्री पावने दहाच्या सुमारास वडारवाडी महालेनगर येथे घडली. याप्रकरणी एका 55 वर्षीय व्यक्तीने चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टोळक्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या शेजाऱ्यासहत घरासमोर बसले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या पाच ते सहा जणांच्या टोळक्याने हातात कोयते व तलावर घेऊन आरडा-अोरडा करत दहशत निर्माण केली. त्यानंतर फिर्यादींच्या वस्तीतील मुलगा आदित्य भोंडवे याला तलवारीने मारहाण केली.
तसेच वस्तीतील नागरिकांनी रस्त्यावर लावलेल्या गाड्यांची तोडफोड करून नुकसान केले. यातील एक आरोपी हा रेकाॅर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याला तडीपार करण्यात आल्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रेम वाघमारे यांनी सांगितले.