Corona : घरात विलगीकरणातील रुग्ण असताना काय काळजी घ्यावी ? वाचा सविस्तर

नवी दिल्ली, – देशात आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेक राज्यांमध्ये ऑक्‍सिजनची कमतरता, बेडस नसणे, रेमडेसिविर इंजेक्‍शनचा तुटवडा, आयसीयू बेडस्‌ उपलब्ध नसणे अशा अनेक समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. अहमदाबादसारख्या शहरांमध्ये तर रुग्णालयांबाहेर रुग्णावाहिकेतच अनेक करोऩाग्रस्त बेड मिळण्याची वाट पहात असल्याचे दूरचित्र वाहिन्यांनी दाखवले आहे. तब्बल 20 रुग्णवाहिका रांगेत असल्याचे पाहून आता यांच्यावर केव्हा उपचार सुरू होतील असे प्रश्न पाहाणाऱ्याला पडत होते. अर्थात त्यापेक्षा वाईट अवस्था नातेवाईकांची होती. गंभीर असणाऱ्या रुग्णांसाठी पहिल्यांदा बेड मिळवण्यासाठी धावाधाव करणे, बेड मिळाल्यावर इंजेक्‍शनसाठी धावाधाव करावी लागत असल्याचे दिसत होते.

अनेकांनी बेड मिळत नाही म्हटल्यावर डॉक्‍टारांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णाला घरीच ऑक्‍सिजनचा पुरवठा करणे सुरु केले. त्यासाठीच्या सिलिंडरसाठी दिल्लीसह अनेक शहरांत रांगा लागल्याचे चित्र होते. अनेकजण स्वतःच उचलून सिलिंडर घेऊन जात होते तर अऩेकांना पदपथावर, रुग्णालयाच्या बाहेर ऑक्‍सिजन लावल्याची छायाचित्रे मनाला अस्वस्थ करणारी होती. अर्थात करोनाच्या दुसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी रुग्णालये, डॉक्‍टर, परिचारिकांपासून ते वैद्यकीय सेवेतील सर्व कर्मचारी योद्‌ध्यांप्रमाणे लढताना दिसत आहे. दुसरीकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या पातळीवर या लाटेचा सामना करण्याच्या दृष्टीने आधीपासून कुठेलही नियोजन करण्यात आले नसल्याचे समोर आले. अवतीभवती अशी सगळी भीषण परिस्थिती असताना आता आपणच जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज निर्माण झालेली आहे.

नेहमी चेहरा, तोंड आणि नाकाला हाताचा स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या. घरात
विलगीकरणातील रुग्ण असताना तर हे काटेकोरपणे पाळा. घरात करोना रुग्ण असेल तर कायम दुहेरी मास्क वापरा. करोना रुग्णाच्या आसपास किंवा तो असलेल्या खोलीत जाऊन आल्यानंतर हात स्वच्छ धुवा.

1) स्वयंपाकाला सुरवात करण्यापूर्वी, खाण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवा. तसेच
टॉयलेटला जाऊन आल्यानंतरही हात साबणाने स्वच्छ धुवा. साबण लावून किमान
चाळीस सेकंद हात चोळून नंतर धुवा.

2) अल्कोहोल बेस्ड हॅंड रब्ज किंवा सॅनिटायजर्सचा वापर करा.

3) शक्‍य असेल तर हात पुसण्यासाठी डिस्पोजेबल पेपर टॉवेल्स वापरा. ते नसतील तर
केवळ हात पुसण्यासाठीच वेगळा स्वच्छ टॉवेल ठेवा. तो ओला झाला की धुवून टाका.

4) विलगीकरणातील रुग्णाला स्पर्श करून मदत करताना नेहमी मास्क आणि ग्लोव्हज
वापरा. त्याचबरोबर प्लॅस्टिकच्या ऍप्रनचा वापर करा. सोडियम हायपोक्‍लोराईटचा
वापर करून एप्रन निर्जंतुक करा.

5) करोना रुग्णासोबत सिगारेट, पेये, भांडी, त्याने वापरलेले टॉवेल, बेडशीटचा वापर करू
नका. करोना रुग्णाच्या खोलीबाहेर स्टूलवर त्याचे जेवणाचे ताट ठेवावे. शक्‍यतो
त्याच्या खोलीत प्रवेश करू नये. त्याचे ताट, चमचे व इतर भांडी हाताळताना
ग्लोव्हजचा वापर करा. धुण्यासाठी त्याचे कपडे, बेडशीट, टॉवेल वेगळे ठेवा. ते गरम
पाण्यात भिजवून धुवा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.