पुणे दी 11 -बुधवार पेठेत पोलीस हवालदाराचा चाकुने सपासप वार करून खून केल्याच्या प्रकारणातील संशयित महिलेचा शोध घेण्यास गेलेल्या पुणे पोलिसांवर आणी वाहनावर गाझियाबादमध्ये जमावाने हल्ला केला.य गाडीचा चुराडा झाला ़़मात्र याही परिस्थितीत फरासखाना पोलिसांनी त्या महिलेला पकडलेच. आता तिला घेऊन पोलीस परत निघाले आहेत. मागिल आठवड्यात बुधवार पेठेत मध्यरात्री तडीपार गुंड प्रवीण श्रीनिवास महाजन (वय 36) याने पोलीस हवालदाराचा गळ्यावर आणि पोटात चाकूने वार करून खून केला होता.
याप्रकारणाने पुणे शहर पोलीस दलात खळबळ उडाली होती. पोलिसांनी गुंड प्रवीण उर्फ पव्या याला तासाभरातच पकडले होते. दरम्यान, त्याच प्रकरणात एक संशयित महिला आरोपीसोबत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावेळी ही महिला गाझियाबादला पसार झाली असल्याचे समजले. मग तिला शोधण्यासाठी दोनच दिवसांपूर्वी सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील व त्यांचे सहकारी असे 5 जणांचे पथक गाझियाबाद येथे गेले होते. तिचा शोध घेत असताना ती येथील वेश्या वस्तीत असल्याची माहिती मिळाली. मग पोलिसांनी पुन्हा आणखी दोन महिला कर्मचार्यांना गाझियाबाद येथे बोलवून घेतले आणि तिला पकडण्याचा प्लॅन केला.स्थानिक पोलिसांची एक टीम बोलावली. त्यांना कल्पना दिली.
त्यांनी काही अंतरावर नेलेली इनोव्हा कार पार्क केली. त्यानंतर त्या वस्तीत तिचा शोध सुरू केला. दोन टीम करून वेगवेगळ्या रस्त्याने जात होते. पण, पोलिसांचे पथक साध्या वेशात (सिव्हील) असल्याने येथील नागरिकांचा गैरसमज झाला आणि त्यांनी पार्क केलेली पोलिसांची खासगी गाडीची तोडफोड करण्यास सुरुवात केली त्यानंतर स्थानिक नागरिकांकडून पोलिस पथकावर भ्याड हल्ला करण्यात आला. या जमावाने प्रचंड गोंधळ घातला होता.
स्थानिक पोलिसांनी पटकन धाव घेत आले आणि त्यांनी परिस्थिती हाताळली. आता आपले पथक पुन्हा वापस येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर पकडण्यास गेलेल्या महिलेला पकडले असून, तिला पुण्यात घेऊन हे पथक येत आहे. स्थानिकांच्या हल्ल्यात पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
पथकावर हल्ला झाला असून, काहींना मुका मार लागला आहे ़़ पथक महिला आरोपीला घेऊन निघाले आहे – प्रियंका नारनवरे ( उपायुक्त, परिमंडळ 1)
ग़ाज़ियाबाद के नंदग्राम में दबिश देने आए महाराष्ट्र पुलिस कर्मियों की पिटाई करते हुए और गाड़ी को तोड़ते हुए वीडियो वायरल.. pic.twitter.com/pfs3lFAJCK
— Himanshu Sharma (@himanshujourn) May 11, 2021