नगर (प्रतिनिधी) – नवीन रुग्णसंख्या आज तीन हजारांच्या आत असून, आज नव्या बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असल्याची माहिती वैद्यकीय बुलेटीनमधून देण्यात आली आहे. जिल्ह्यात आज 3,130 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 46 हजार 658 इतकी झाली आहे.
दरम्यान, रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 85.72 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 2935 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 22 हजार 464 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 794, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 1 हजार 242 आणि अँटीजेन चाचणीत 899 रुग्ण बाधित आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 39, जामखेड 118, कर्जत 58, कोपरगाव 61, नगर ग्रामीण 51, नेवासा 32, पारनेर 24, पाथर्डी 70, राहता 92, राहुरी 24, संगमनेर 02, शेवगाव 98, श्रीगोंदा 22, श्रीरामपूर 35, कँटोन्मेंट बोर्ड 50, मिलिटरी हॉस्पिटल 12 आणि इतर जिल्हा 06 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 458, अकोले 03, जामखेड 09, कर्जत 16, कोपरगाव 07, नगर ग्रामीण 178, नेवासा 27, पारनेर 24, पाथर्डी 30, राहाता 74, राहुरी 45, संगमनेर 205, शेवगाव 12, श्रीगोंदा 48, श्रीरामपूर 62, कँटोन्मेंट बोर्ड 17 आणि इतर जिल्हा 27 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 899 जण बाधित आढळून आले. मनपा 160, अकोले 08, जामखेड 26, कर्जत 04, कोपरगाव 43, नगर ग्रामीण 78, नेवासा 41, पारनेर 55, पाथर्डी 05, राहाता 94, राहुरी 129, संगमनेर 40, शेवगाव 18 श्रीगोंदा 168, श्रीरामपूर 13, कँटोन्मेंट 08 आणि इतर जिल्हा 09 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 598, अकोले 197, जामखेड 66, कर्जत 336, कोपरगाव 177, नगर ग्रामीण 213, नेवासा 137, पारनेर 40, पाथर्डी 139, राहाता 301, राहुरी 154, संगमनेर 226, शेवगाव 136, श्रीगोंदा 128, श्रीरामपूर 174, कॅन्टोन्मेंट 24, मिलिटरी हॉस्पिटल 13, इतर जिल्हा 69 आणि इतर राज्य 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.
करोना अपड्ेटस
बरे झालेली रुग्ण संख्या:1,46,658
उपचार सुरू असलेले रूग्ण:22464
जिल्ह्यातील एकूण मृत्यू:1965
एकूण रूग्ण संख्या:1,71,087