गेल्या काही महिन्यांपासून कपूर खानदानावर एकापाठोपाठ एक अनेक दुःखाचे प्रसंग येऊन पडले आहेत. गेल्या वर्षी अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन झाले. त्यानंतर या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच ऋषी कपूर यांचे धाकटे बंधू राजीव कपूर यांचेही निधन झाले. आता या पिढीतील रणधीर कपूर आणि त्यांची बहीण रिमा जैन हे दोघेच भाऊ बहीण हयात आहेत.
या दोघांनीही राजीव कपूर यांच्या प्रॉपर्टीवर हक्क सांगणारी याचिका हायकोर्टात दाखल केली आहे. राजीव कपूर आणि त्यांची पत्नी कित्येक वर्षांपूर्वीच विभक्त झाले आहेत. या दोघांना कधीच एकत्र बघितले गेलेले नव्हते. म्हणूनच रणधीर कपूर आणि रिमा जैन यांनी राजीव कपूर यांचे कायदेशीर वारस असल्याचा दावा केला आहे.
आता राजीव कपूर यांच्या पत्नीचा त्यांच्या मालमत्तेवर काहीही अधिकार नाही, हे सिद्ध करण्यासाठी या दाम्पत्याचा घटस्फोट झाला असल्याचे सिद्ध करा आणि त्यासाठी या घटस्फोटाचे पुरावे कोर्टात सादर करा, असे कोर्टाने या भावा-बहिणीला सांगितले आहे.