अभिनेता ‘जिमी शेरगिल’ला केले पोलिसांनी अटक

जिमी शेरगिलला मंगळवारी लुधियाना पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर करोनाच्या प्रतिबंधासाठी नाइट कर्फ्यूचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. जिमी शेरगिल तेव्हा एका वेबसीरिजचे शूटिंग करत होता. 

मात्र, करोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांनुसार रात्रीची संचारबंदी लागू असताना हे शूटिंग सुरू होते म्हणून पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि शूटिंग करणाऱ्या सगळ्यांनाच ताब्यात घेतले.

यामध्ये या युनिटमधील 35 जणांनाही अटक करण्यात आली, तर जिमी शेरगिलबरोबर अन्य चौघा कलाकारांविरोधात केसदेखील दाखल करण्यात आली आहे.

यावेळी जिमी शेरगिल एका पंजाबी वेबसीरिजचे शूटिंग करत होता. हे शूटिंग एका शाळेमध्ये सुरू होते. तिथे कोर्टाचा सेट उभा करण्यात आला होता. जेव्हा पोलीस तिथे पोहोचले, तेव्हा सेटवरील कोणीही मास्क लावलेला नव्हता.

सोशल डिस्टन्सिंगदेखील पाळले जात नव्हते. म्हणून सोमवारी पोलिसांनी सेटवर जाऊन सगळ्यांना तंबी दिली होती आणि दंडही केला होता. मात्र, मंगळवारीही तसेच शूटिंग सुरू राहिल्याने अखेर चार कलाकारांना अटक करावी लागली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.