प्रियांका चोप्राची चुलतबहीण परिणिती चोप्राही तिच्यासारखीच टॅलेंटेड ऍक्ट्रेस आहे. ती तर ऍक्टिंगबरोबर चांगली गायिकाही आहे. तिने बॉलीवूडमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. पण तिची धाकटी बहीण आणि प्रियांकाची आणखी एक चुलतबहीण मीरा चोप्राला अद्याप आपले करिअर करता आलेले नाही. मात्र यासाठी प्रियांकाच जबाबदार असल्याचे मीरा म्हणते आहे. प्रियांकाच्या अगोदर ती सिनेवर्ल्डमध्ये आली होती.
View this post on Instagram
मात्र, प्रियांका यशस्वी झाल्यापासून मीराकडे कोणी बघितलेही नाही. प्रियांकाची बहीण म्हणून जो फायदा व्हायला पाहिजे होता, तो देखील झाला नाही, असे तिला वाटते आहे. मीराने यापूर्वी “द टॅटू मर्डर्स’मध्ये काम केले होते.
View this post on Instagram
याशिवाय तिने तमिळ आणि तेलगू सिनेमांमधूनही काम केले आहे. मात्र, अजूनही तिला मनासारखे यश मिळालेले नाही. पण याला तिच्या स्वतःच्या टॅलेंटपेक्षा प्रियांकाचे ग्लॅमरच अधिक जबाबदार आहे, असे म्हणणे म्हणजे अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडण्यासारखेच आहे, असे वाटते.