लखनौ : उत्तरप्रदेशला ऑक्सिजन पुरवठा करणारी ऑक्सिजन एक्स्प्रेस ही रेल्वेगाडी उत्तरप्रदेशात पोहचली असून त्यातून त्या राज्याला 30 हजार लिटर्स लिक्वीड ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला आहे. आज सकाळी साडे सहा वाजता दोन टॅंकर लखनौला पोहचले.
एक ट्रक वाराणसीला पोहोचवण्यात आला. झारखंडलाही मेडिकल ऑक्सिजन पुरवणारे दोन टॅंकर्स आज सकाळी बोकारो येथे पोहचले आहेत. लखनौला दोन टॅंकर्स मिळाले त्यातून लखनौ शहाराची निम्मी गरज भागणार आहे.
दरम्यान, राज्य सरकारकडून विनंती आल्यानंतर आम्ही उत्तरप्रदेशसाठी दुसरी ऑक्सिजन एक्स्प्रेस गाडी सोडण्यास तयार आहोत असे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे. देशभर ऑक्सिजन पुरवण्यासाठी पुढील काही दिवस आम्ही देशाच्या विविध भागांसाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस सोडणार आहोत असेही रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे.