अहमदाबाद, दि. 10 – गुजरात मध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्याची इच्छा नाही असे त्या राज्याचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी म्हटले आहे. तथापि लोकांनी स्वयंस्फुर्तीने बंद किंवा निर्बंध पाळले तर सरकार त्याचे स्वागतच करील असेही त्यांनी म्हटले आहे. करोनाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभुमीवर आम्ही या आधीच रात्री दहा तासांचा कर्फ्यु लावला आहे. लॉकडाऊन लागू केल्यास त्याचा गरीबांना सर्वाधिक फटका बसतो त्यामुळे आम्ही तसे करण्यास राजी नाही असे ते म्हणाले. गुजरात मध्ये अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये मोठ्या प्रमाणात करोना केसेस आढळून येत आहेत. ज्या ठिकाणी हे प्रमाण अधिक आहे, त्या भागापुरता लॉकडाऊन अनेक ठिकाणी केला गेलेला आहे.त्या व्यतिरीक्त लोकांनीच उत्स्फुर्तपण हा बंद पाळावा त्याला आमचा पाठिंबा राहील असे ते म्हणाले. दरम्यान गुजरात मध्ये करोना रूग्णांची संख्या प्रचंड वाढल्याने हॉस्पिटल्स अपुरी पडू लागली असून औषधांचाहीं तेथे मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे.