IPL 2021 : चेन्नईविरुद्ध नाणेफेक जिंकून दिल्लीचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय

मुंबई – इंडियन प्रिमीयर लीग क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या टी-२० क्रिकेट सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय निर्णय घेतला.

महेंद्रसिंह धोनीचे सल्ले शिरसावंध मानून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थिरावलेल्या ऋषभ पंतसाठी आजचा सामना स्वप्नपूर्तीचा ठरणार आहे. धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्जशी पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सची लढत होत आहे. या सामन्याद्वारे यंदाच्या स्पर्धेत विजयी सलामी देण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न राहणार आहे.

दिल्लीचे सलामीवीर शिखर धवन, तुफान भरात असलेला पृथ्वी शॉ, अजिंक्‍य रहाणे व अफलातून टचमध्ये असलेला नवनियुक्‍त कर्णधार ऋषभ पंत यांच्यावरच त्यांची फलंदाजी अवलंबून आहे, तर चेन्नईलादेखील धोनीसह सुरेश रैना, चेतेश्‍वर पुजारा, रवींद्र जडेजा, फाफ डुप्लेसिस, सॅम कुरेन व ऋतुराज गायकवाड यांच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी रैनाने करोनाच्या भीतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यावेळी धोनीच्या संघाने अत्यंत सुमार कामगिरी केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.