ढाका – करोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षाही अधिक धोकादायक असल्याचे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी म्हटले. करोनाला अटकाव करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे आणि निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
पंतप्रधान शेख हसीना यांनी सांगितले की, नागरिकांनी नियमांचे आणि सुचनांचे पालन केल्यास करोना परिस्थिती नियंत्रणात राहू शकते. अनेक कठीण परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो याची कल्पना असल्याचे त्यांनी म्हटले. शेख हसीना यांनी नागरिकांना मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
परदेशातून येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाइन करण्याची सूचना त्यांनी दिली आहे. लहान मुले आणि युवकांची विशेष काळजी घेण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली. या गटात करोना संसर्गाचा दर अधिक आहे.