नगर – शहरासह जिल्ह्यात करोनाने फास आवळण्यास सुरुवात केली आहे. एकाच दिवसात तब्बल 1 हजार 800 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर गेल्या 24 तासात 11 जणांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीमध्ये समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात एक प्रकारे करोनाने तांडवच घातले आहे. तर जिल्ह्यात आज 645 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या 8 हजार 335 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 434, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 882 आणि अँटिजेन चाचणीत 484 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 186, अकोले 16, जामखेड 1, कोपरगाव 23, नगर ग्रामीण 23, नेवासे 13, पारनेर 13, पाथर्डी 53, राहता 1, राहुरी 10, शेवगाव 1, श्रीगोंदा 4, श्रीरामपूर 21, कॅन्टोन्मेंट बोर्ड 68 आणि इतर जिल्हा 1, अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 242, अकोले 20, जामखेड 3, कर्जत 7, कोपरगाव 85, नगर ग्रामीण 62, नेवासे 24, पारनेर 22, पाथर्डी 19, राहाता 138, राहुरी 42, संगमनेर 67, शेवगाव 33, श्रीगोंदा 6, श्रीरामपूर 74, कॅन्टोन्मेंट 5 आणि इतर जिल्हा 33, अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजेन चाचणीत आज 484 जण बाधित आढळून आले. मनपा 28, अकोले 26, जामखेड 40, कर्जत 66, कोपरगाव 2, नगर ग्रामीण 22, नेवासे 35, पारनेर 16, पाथर्डी 64, राहाता 69, राहुरी 35, संगमनेर 4, शेवगाव 3, श्रीगोंदा 26, श्रीरामपूर 39, कॅन्टोन्मेंट बोर्ड 8 आणि इतर जिल्हा 1, अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 225, अकोले 18, जामखेड 18, कर्जत 17, कोपरगाव 53, नगर ग्रामीण 33, नेवासे 14, पारनेर 38, पाथर्डी 17, राहाता 50, राहुरी 15, संगमनेर 59, शेवगाव 21, श्रीगोंदा 2, श्रीरामपूर 55, कॅन्टोन्मेंट 6 आणि इतर जिल्हा 13, अशा रुग्णांचा समावेश आहे.
88473 – बरे झालेली रुग्णसंख्या
8335 – उपचार सुरू असलेले रुग्ण
1233 – जिल्ह्यातील एकूण मृत्यू
98041 – एकूण रुग्णसंख्या