बारामती (प्रतिनिधी) : शहरातील इंदापूर रोड वरील मोतीबाग चौक पुलावर ट्रकचा भीषण अपघात झाला असून एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
श्रीनाथ ट्रान्सपोर्ट चा ट्रक इंदापूर बारामती दिशेने निघाला होता. चालकाचा ताबा सुटल्याने मोतीबाग येथील पुलावरील दुभाजकाला धडकून साखरेच्या पोत्यांनी भरलेला ट्रक उलटला. या झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. मात्र त्याचे नाव अद्याप समजू शकले नाही नाही. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.