मुंबई : राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत असताना करोनाचा विषाणू मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानापर्यंत आधीच पोहोचला होता. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि राज्य सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांना करोनाचा संसर्ग झाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनाही करोनाचा संसर्ग झाल्याचं २३ मार्च रोजी स्पष्ट झालं होतं. आता रश्मी ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
रात्री रश्मी ठाकरे यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर, त्या घरीच क्वारेंटाइन झाल्या होत्या. रश्मी ठाकरे यांची प्रकृती उत्तम होती. त्यामुळे त्यांनी घरीच क्वारेंटाइन होण्याचा निर्णय घेतला होता. आता रुटीन चेकअपसाठी त्या रुग्णलयात गेल्याचं सुत्रांनी सांगितलं.