सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात काल सोमवारी रात्री बारा वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 191 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तर एका बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. या करोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.
सातारा तालुका ः सातारा 4, सदरबझार 4, खेड, कृष्णानगर प्रत्येकी 3, गोडोली, गडकर आळी, राधिका रोड प्रत्येकी 2, अपशिंगे, जकातवाडी, देगाव रोड, विसावा नाका, नुने, देगाव, करंजे, सासुर्वे, अंभेखरी, खिंडवाडी, संगमनगर, मालदन, सदाशिव पेठ, मिताल, मंगळवार पेठ, शुक्रवार पेठ, सोमवार पेठ, केसरकर पेठ, अतित, गेंडामाळ, वडूथ, कोडोली, शाहूनगर, साई कॉलनी, कोंडवे, काशिळ प्रत्येकी 1.,
कराड तालुका ः कराड 2, शनिवार पेठ 5, मलकापूर, सैदापूर, मंगळवार पेठ प्रत्येकी 3, आगाशिवनगर, कोळेवाडी प्रत्येकी 2, सोमवार पेठ, शुक्रवार पेठ, विद्यानगर, पाल, तांबवे, जाखीनवाडी, पवार वस्ती, गुरुवार पेठ, शेरे, वहागाव, गोळेश्वर, काले, पार्ले प्रत्येकी 1.,
पाटण तालुका ः माजगाव 5, पाटण, ढेबेवाडी, गव्हानवाडी प्रत्येकी 1., फलटण तालुका ः जाधववाडी 3, लक्ष्मीनगर, जिंती, मलटण, साखरवाडी प्रत्येकी 2, बिरदेवनगर, शिवाजीनगर, तरडगाव, कोळकी, गिरवी, नांदल, बारसर गल्ली, बुधवार पेठ, भडकमकरनगर, खुंटे, संजीवराजे नगर, फडतरवाडी, सोमवार पेठ, शुक्रवार पेठ, नरसोबा नगर, गुणवरे, काळज, सरडे, आलगुडेवाडी, पाचबत्ती चौक, सालपे, गोखळी प्रत्येकी 1.,
खटाव तालुका ः पुसेसावळी 4, वडूज 3, बुध 2, पुसेगाव, चितळी, गोरेगाव वांगी प्रत्येकी 1.,
माण तालुका ः पळशी 3, बोराटवाडी, दहिवडी, गोंदवले खु, शिंगणापूर, घेरेवाडी प्रत्येकी 1.,
कोरेगाव तालुका ः कोरेगाव 6, ल्हासुर्णे, शिरढोण, किरोली वाठार प्रत्येकी 1.,
वाई तालुका ः गणपती आळी 3, सोनगिरवाडी, वाई प्रत्येकी 2, रविवार पेठ, गंगापुरी, सिद्धनाथवाडी, धर्मपुरी, फुलेनगर, यशवंतनगर, बावधन, भुईंज, एकसळ प्रत्येकी 1.
खंडाळा तालुका ः लोणंद 5, शिरवळ 2, विंग, खंडाळा प्रत्येकी 1.,
जावळी तालुका ः जावळी 1.
महाबळेश्वर तालुका ः महाबळेश्वर 4, मेटगुट 1.,
इतर ः 1, खर्शी 1., बाहेरील जिल्ह्यातील सांगली 3, शेडगेवाडी ता. शिराळा, मिरज, बोंबाळेवाडी, पलूस, कोपरगाव जि. अहमदनगर प्रत्येकी 1.
एका बाधितांचा मृत्यू
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कोरेगाव येथील 65 वर्षीय कोविडबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबळींची एकूण संख्या आता एक हजार 903 इतकी झाली आहे. .
एकूण नमुने -402823 *
एकूण बाधित -65153
घरी सोडण्यात आलेले -59846
मृत्यू -1903
उपचारार्थ रुग्ण -3404