पुणे – सदाशिव पेठ येथील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद संस्थेला भीषण आग लागली आहे. भंगाराच्या साहित्याला आग लागली असल्याचे समोर येत आहे. याची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत.
दरम्यान, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.