राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अचानक पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे निदान करण्यात आले असून त्यांची प्रकृत्ती स्थिर असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. बुधवारी पवारांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
पवारांच्या प्रकतीबाबतचे वृत्त समजताच राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शरद पवारांची प्रकृती लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना केली आणि सदिच्छा व्यक्त केल्या. तर दुसरीकडे दिल्ली भाजपाचे मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदल यांनी शरद पवारांवर टीका केली. त्यांनी पवारांच्या पोटदुखीच्या त्रासाचा संबंध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं भरलेली स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात एनआयएने अटक केलेल्या सचिन वाझेंसोबत जोडला.
सचिन वाजे ने NIA के सामने अब ऐसा क्या खुलासा कर दिया की शरद पवार अचनाक को इतना तेज पेट दर्द हुआ की उन्हें हॉस्पिटल में भर्ती होना पड़ा है अब तो ऐसा लग रहा है की दाल में कुछ कला नहीं बल्कि पूरी की पूरी दाल ही काली है। #महाराष्ट्र_सरकार
— Naveen Kumar (@naveenjindalbjp) March 29, 2021
अटक केल्यापासून वाझे दररोज नवनवीन खुलासे करत आहेत. यावरुन बोलताना जिंदल यांनी पवारांवर निशाणा साधला. “सचिन वाझेने एनआयएसमोर असा कोणता खुलासा केला की, शरद पवार यांच्या अचानक पोटात दुखायला लागलं आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं. आता तर असं वाटतंय की…दाल में कुछ कला नहीं बल्कि पूरी की पूरी दाल ही काली है”, असं ट्विट नवीन कुमार यांनी केलं. याशिवाय, “पवारांच्या अचानक पोटदुखीमुळे पश्चिम बंगालआधी महाराष्ट्रातच सत्तांतर होईल असं का वाटतंय” असेही कुमार यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले.
शरद पवार के पेट में अचानक दर्द होने की खबर से ऐसा क्यों लग रहा है कि बंगाल से पहले खेला महाराष्ट्र में होने वाला है।
— Naveen Kumar (@naveenjindalbjp) March 29, 2021
दरम्यान, शरद पवार हे सध्या सुरु असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये प्रचारसभा घेणार होते. पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये त्यांचे प्रचार दौरे नियोजित होते. मात्र आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याने त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.