मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यामुळे रविवारी, 28 मार्चला संध्याकाळी मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. वैद्यकीय तपासणीत त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ही माहिती आपल्या ट्विटर हँडलवरून दिली आहे.
शरद पवार यांच्यावर बुधवारी एन्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शरद पवारांवरील शस्त्रक्रिया नीट पार पाडावी यासाठी राजकीय व कला क्षेत्रातून सदिच्छा देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर शरद पवार यांनी ट्विट करत दोघांचेही मनापासून आभार मानले आहेत.
उध्दव ठाकरे यांचे आभार व्यक्त करताना शरद पवार यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे की, “महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी माझ्या प्रकृतीसंदर्भात अत्यंत आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या सदिच्छा या महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक भावना आहेत. मनपूर्वक आभार!
महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी माझ्या प्रकृतीसंदर्भात अत्यंत आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या सदिच्छा या महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक भावना आहेत. मनपूर्वक आभार! @OfficeofUT@CMOMaharashtra
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 29, 2021
तर राज ठाकरे यांचे आभार मानताना पवार यांनी म्हटले आहे की, “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. राज ठाकरे यांनी माझ्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सदिच्छा व्यक्त करत आस्थेने चौकशी केली. त्यांचे मनापासून आभार! “
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. राज ठाकरे यांनी माझ्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सदिच्छा व्यक्त करत आस्थेने चौकशी केली. त्यांचे मनापासून आभार! @RajThackeray
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 29, 2021
दरम्यान, पुढील काही काळात ते पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये प्रचार दौरेही करणार होते. मात्र, अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांचे सर्व कार्यक्रम पुढील सूचनेपर्यंत रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती सुध्दा नवाब मलिक यांनी ट्विट करून दिली आहे.