महत्वाचे! 31 मार्चपर्यंत PAN-Aadhaar लिंक न केल्यास 10 हजार रुपये ‘दंड’; जाणून घ्या लिंक कसं करायचं

नवी दिल्ली – तुम्ही आतापर्यंतही पॅन-आधार लिंक केले नसेल तर तात्काळ करून घ्या. पॅन-आधार लिंक करण्याची आयकर विभागाने निश्चित केलेली शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे. जर तुम्ही 31 मार्चपर्यंत लिंक केले नाही तर तुमचे पॅनकार्ड रद्द होणार आहे. शिवाय तुम्हाला आयकर कायद्यानुसार 10 हजार रुपयांपर्यंत दंड बसू शकतो.

केंद्र सरकारने याआधी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यात उशीर करणाऱ्यास 1000 रुपये लेट फीस चार्ज केली होती. नवीन सेक्शन 234H फायनान्स बिल, लोकसभेत मंजुरीसाठी आले होते. यानुसार, या दोन्ही डॉक्यूमेंट्सला लिंक न केल्यास 10हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. हे लेट फी एक निष्क्रिय पॅन कार्ड लावण्यात येत असलेली पेनल्टी पेक्षा वेगळी असणार आहे. याशिवाय, पॅनकार्ड धारकांना इनकम टॅक्स अंतर्गत शिक्षेची तरतूद आहे.

आयकर विभागाच्या वेबसाईटवरून पॅन-आधार लिंक करा –

  • सर्वात पहिले आयकर विभागाच्या वेबसाईटवर जावे.
  • आधारकार्डवर असलेले नाव, पॅन नंबर आणि आधार नंबर एंटर करा.
  • त्यानंतर कॅप्चा कोड एंटर करा.
  • त्यानंतर लिंक आधार बटनावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचे पॅन आधारशी लिंक होईल.

SMS पाठवून पॅन-आधार लिंक करा –

यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर UIDPAN टाईप करून त्यानंतर 12 अंकांचा आधार नंबर लिहा. त्यानंतर 10 अंकांचा पॅन नंबर लिहा. त्यानंतर 567678 किंवा 56161 या क्रमांकावर पाठवा.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.