मुंबई – मागील काही दिवसांपासून देशभरात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात प्रामुख्याने महाराष्ट्रात रुग्ण वाढ अधिक आहे. बॉलिवूडमध्येही करोनाने शिरकाव केला असून अनेक कलाकारांना करोनाची लागण होत आहे. मध्यंतरी अभिनेता रणबीर कपूर आणि आमिर खानला करोनाची लागण झाली होती. त्यातच आता बॉलिवूडचा फिट आणि हिट असलेल्या अभिनेता मिलिंद सोमणला सुद्धा करोनाची लागण झाली आहे.
Tested positive. #Quarantine
— Milind Usha Soman (@milindrunning) March 25, 2021
स्वतः मिलिंद सोमण याने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. “पॉझिटिव्ह टेस्ट आली..’ असं ट्विट त्याने केलंय. त्याचसोबत क्वारंटीन झाल्याचं देखील त्यानं सांगितलं आहे. राज्यासह देशात करोनाचं संकट पुन्हा एकदा डोकं वर काढू लागलं आहे.
मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढतेय. एकीकडे लसीकरण सुरु करण्यात आलं असलं तरी करोनाचा धोका वाढत असल्यानं नागरिकांनी पुन्हा एकदा सर्व नियमांचं पालन करावं अशा सुचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत.