नगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आज 337 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 77 हजार 602 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 95.26 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्ह्यात रुग्ण संख्येत 475 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 2 हजार 681 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 184, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 228 आणि अँटिजेन चाचणीत 63 रुग्ण बाधित आढळले जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 72, जामखेड 7, कर्जत 1, नगर ग्रामीण 9, नेवासे 5, पारनेर 5, राहाता 23, राहुरी 5, संगमनेर 15, शेवगाव 38, श्रीरामपूर 1, कॅन्टोन्मेंट 3, अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 66, अकोले 10, जामखेड 3, कर्जत 2, कोपरगाव 15, नगर ग्रामीण 9, नेवासे 7, पारनेर 5, पाथर्डी 7, राहाता 38, राहुरी 11, संगमनेर 28, शेवगाव 3, श्रीगोंदा 4, श्रीरामपूर 15, कॅन्टोन्मेंट 1 आणि इतर जिल्हा 4, अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजेन चाचणीत आज 63 जण बाधित आढळून आले. मनपा 23, जामखेड 1, कर्जत 2, कोपरगाव 1, नेवासे 3, पारनेर 1, राहाता 16, राहुरी 5, श्रीगोंदा 3, श्रीरामपूर 5, कॅन्टोन्मेंट 1 आणि इतर जिल्हा 2, अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 103, अकोले 7, जामखेड 5, कर्जत 3, कोपरगाव 24, नगर ग्रामीण 11, नेवासे 17, पारनेर 11, पाथर्डी 8, राहाता 53, राहुरी 10, संगमनेर 39, शेवगाव 9, श्रीगोंदा 7, श्रीरामपूर 20, कॅन्टोन्मेंट 4 आणि इतर जिल्हा 6, अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्णसंख्या : 77602
उपचार सुरू असलेले रुग्ण : 2681
जिल्ह्यातील एकूण मृत्यू : 1180
एकूण रुग्णसंख्या : 81463