मुंबई -आपल्या अभिनयाबरोबर आपल्या लूक्समुळे रसिकांची मनं जिंकलेली मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री ‘ संस्कृती बालगुडे’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. चर्चेत येण्यास कारणीभूत ठरले आहेत तिचं सनकिस्ड फोटोशूट. तिच्या या फोटोंमधील अदा कुणालाही घायाळ करतील अशाच आहेत.
View this post on Instagram
चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारणारी संस्कृती सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.
View this post on Instagram
सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टाईलने संस्कृती बालगुडेने रसिकांवर मोहिनी घातली आहे. नुकतंच तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही हटके फोटो शेअर केले असून, यात संस्कृती खूपच हॉट दिसत आहे.
View this post on Instagram
संस्कृतीच्या फॅन्सकडून तिच्या या फोटोंवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. काही जण तिच्या प्रेमात देखील पडले आहे. संस्कृती शेवटची ‘सर्व लाइन व्यस्त आहेत’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.