कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली ६ वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
View this post on Instagram
ह्या आठवड्यात चला हवा येवू दया च्या मंचावर हजेरी लावली ती ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मधील कलाकारांनी, यावेळी कलाकारांनी मालिकेतील अनुभव शेअर केले.
या भागात मुख्य आकर्षण ठरला तो म्हणजे खानविलकरांच्या घरातील मुख्य सदस्य ‘जादू’. भाऊ कदम बरोबर जादूने एकच धमाल उडवून दिली. हवा येऊ द्या च्या विनोदवीरांनी यावेळी येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेवर स्पूफ करून एकच हास्यकल्लोळ उडवून दिला.
‘निलेश साबळेने साकारलेला ओम’ आणि ‘भाऊ ने साकारलेली स्वीटू’ यावेळी भाव खाऊन गेली. तेव्हा पाहायला विसरू नका हास्याने लोटपोट करणारे हवा येऊ द्या चे हे मजेशीर भाग १ ते ३ मार्च रात्री ९.३० ते १०.३० फक्त आपल्या झी मराठीवर.