कॅरम वंशातील वनस्पतीचं सुकलेलं पक्व फळ म्हणजे शहाजिरं. मूळची वनस्पती युरोप आणि पश्चिम आशियातील आहे. जिरंवर्गीय गटातलंच असल्यामुळे दिसायला नेहमीच्या जि-याप्रमाणेच असतं. मात्र हे जिरं आकाराने जरा जाड असतं. डेन्मार्क, नेदरलँड, पोलंड, इथिओपिया आणि रशिया या देशात मोठया प्रमाणात लागवड होते.
भारतात बिहार, ओरिसा, पंजाब आणि आंध्र प्रदेश या ठिकाणी लागवड होते. यात काव्हरेन नावाचा स्वादकारक घटक असतो. रंगाने करडा असून सुवासिक, उग्र वास असतो. मेरिडियन फिनेल, पर्शिअन क्युमिन या नावांनीही ओळखली जातं. हे झाड दिसायला गाजराच्या झाडाप्रमाणेच असतं. त्याची पानं २०-३० सेंमी लांब असतात. ही सुकलेली फळं पूर्णत: उपयोगात आणली जातात. या शहाजि-याचे आरोग्याच्या दृष्टीने पारंपरिक उपयोग खूप आहेत.
- कफाला प्रतिरोध करणारं असल्यामुळे खोकला झाल्यास शहाजि-याची पूड करून मधातून खावी.
- स्नायूंचं दुखणं, पायात गोळा येणं, सुज येणं आदी विकारांवर अतिशय उपयुक्त ठरतं.
- उत्तम पाचक असून ते पचनशक्ती सुधारते. पोटाच्या सर्व तक्रारींवर अतिशय उपयुक्त ठरतं.
- थायरॉइडच्या विकारावरही गुणकारी आहे
-
स्वादकारक असल्यामुळे विविध पदार्थात त्याचा वापर केला जातो.
-
भूक वाढवण्यास मदत करते.
- मासिक पाळीदरम्यान होणा-या वेदना कमी करण्यास मदत होते.
- गरोदरपणात दुधाची पातळी वाढवण्यास मदत करते.
- डायरिया झाल्यासही अतिशय उपयुक्त ठरतं.