पुणे – सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खुपच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मुलगी मोबाईलच्या सेल्फीकॅमेरात एक व्हिडिओ काढत आहे. ती मुलगी पहिल्यांदा आपल्या मागे उभी असणारी कार दाखवते. त्यानंतर मागे असलेल्या मित्रांना दाखवते आणि त्याबरोबर काही वाक्य बोलते. ती मुलगी म्हणते, “ये हमारी कार है.., ये हम है और ये हमारी पावरी है (पार्टी) हो रही है..” आपल्या मित्रांसोबत बनवला गेलेला हा व्हिडीओ फक्त चार सेकंदाचा आहे.
दरम्यान, या व्हिडिओत असलेली ही मुलगी, बघता बघता तासाभरातच जोरदार व्हायरल झाली आहे. सध्या सोशलवर या मुलीच्या व्हिडिओवरुन अनके मीम्स बनवले जात आहेत. त्याचबरोबर भारतातील एका संगीतकाराने (यशराज मुखाते) या व्हिडिओचा वापर करुन एक रॅप साँग सुद्धा बनवल आहे. त्यामुळे आज आपण या व्हिडिओबद्दल जाणून घेणार आहोत…
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाकिस्तानात बनवण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानमधील एका 19 वर्षाच्या मुलीने बनवला आहे. या मुलीचे नाव दनानीर मुबीर आहे आणि ती पाकिस्तानच्या पेशावर येथील रहिवासी आहे. तिने हा व्हिडिओ आवर्जून शूट केलेला नाही. आपल्या मित्रांसोबत फिरायला गेल्यानंतर सहज शूट केलेला हा व्हिडिओ आहे. त्यानंतर दनानीर मुबीरने हा व्हिडिओ 6 फेब्रवारीला आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. त्यानंतर तो अजून ही खुप व्हायरल होतोय. सध्या लोक या गाण्याचा वापर करुन वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ बनवत आहेत.
View this post on Instagram
भारतात ‘रसोडे मे कौन था’ असं रॅप साँग तयार करणारा म्युजिक कम्पोसर यशराज मुखाते याने दनानीर मुबीरच्या या व्हायरल व्हिडिओवर रॅप साँगच तयार केलं. या गाण्यात त्याने “ये हमारी चेअर है, ये हमारा चमच है”, असे वाक्य आणखी जोडून त्याने एक साँग तयार केले आहे .जे त्याने आपल्या यूट्यूब चॅनेलवर 12 फेब्रुवारीला शेअर केले. सध्या यशराजचे हे रॅप साँग सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे.
दरम्यान, बघता बघता या व्हायरल व्हिडिओने सिनेकलाकारांना देखील भुरळ घातली आहे. बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने सुद्धा आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो आपली गाडी आणि मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईची पावती दाखवत आहे. त्यावर this is for you @mumbaipolice असे कॅप्शन दिले आहे.
View this post on Instagram
काही वर्षांपूर्वी दुनियादारी या चित्रपटातील “यारा यारा” या गाण्याने प्रसिद्धीझोतात आलेला गायक रोहित राऊत याने सुद्धा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो म्हणत आहे की, “ये हम है, और ये हमारा बँड है और यहा पावरी हो रही है” हा व्हिडिओ त्याने आपल्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर केला आहे. त्याखाली त्याने in between jamming yeh hum hain असे कॅप्शन दिले.
View this post on Instagram
भारतीय लष्करातील जवानांनाही या ‘पावरी’चा मोह आवरता आलेला नाही. जवानांचा ‘पावरी हो रही है’ चा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल की, सीमेवरील भारतीय जवान हे एका बर्फाळ प्रदेशात हातात बंदुका घेऊन उभे आहेत. त्यात एक जवान म्हणतो, “ये हम हैं, ये हमारी गन हैं और हम यहा पेट्रोलिंग कर रहे हैं.” तसंच या व्हिडिओमध्ये जवान तैनात असलेल्या आजूबाजूच्या परिसराची देखील झलक पाहायला मिळत आहे.
Best #yehumhain so far.❤️ pic.twitter.com/pVaX4iqv9D
— Awanish Sharan (@AwanishSharan) February 18, 2021
– विकास मुढे