महिलेने पतीला गाडीला बांधून एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेले ;पहा संपूर्ण घटना

सूरत : गुजरातच्या सुरतमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या पतीच्या दारू पिण्याच्या त्रासाला कंटाळून एक मोठे पाऊल उचलले आहे. महिलेने भावासोबत मिळून नवऱ्यासोबत केलेल्या कृत्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या महिलेने स्वतःच्या पतीला दोरीच्या सहाय्याने टेम्पोच्या मागे बांधले. यानंतर जवळपास एक किलोमीटरपर्यंत त्याला फरफटत नेले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

संबंधित व्यक्ती वारंवार दारू पिऊन आपल्या पत्नीला मारहाण करायचा असा आरोप आहे. याच कारणामुळे त्याला अद्दल घडवण्यासाठी पत्नीने भावासोबत मिळून हा संपूर्ण प्रकार केला आहे. मात्र, या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर पत्नीच्या या अमानुष कृत्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

पती दारू पिऊन आल्यानंतर पत्नीने सर्वात आधी त्याला दोरीने टेम्पोच्या मागे बांधले. यानंतर जवळपास एक किलोमीटर त्याला फरफटत नेले. हा सर्व प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर काही लोकांनी त्याची सुटका केली. संबंधित व्यक्तीची प्रकृती सध्या गंभीर आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित व्यक्तीच्या पत्नी आणि तिच्या भावाविरोधात कारवाई सुरू केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.