मुंबई – आयपीएल यंदाच्या मोसमासाठी प्रायोजक म्हणून चिनी मोबाइल कंपनी व्हिवोचे प्रायोजकत्व पुन्हा मिळाले आहे. मात्र, आता पुन्हा एकदा यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
आयपीएलला प्रायोजित करण्यासाठी बीसीसीआयला व्हिवोकडून 440 कोटी रुपये मिळत होते. परंतु गेल्यावर्षी भारत व चीन सीमेवरील पूर्व लडाखमध्ये तणाव निर्माण झाल्यामुळे बीसीसीआयने हा करार स्थगित केला होता. त्यानंतर ड्रीम 11 व अनअकादमी यांच्याकडून व्हिवोच्या अपेक्षेप्रमाणे प्रस्ताव आले नाहीत.
2020 साली ड्रीम 11 ने 222 कोटी रुपये रकमेला प्रायोजकत्वाचे अधिकार मिळवले. ही रक्कम व्हिवोच्या करार रकमेपेक्षा जवळपास निम्मी आहे. व्हिवोने 2018 ते 2022 या पाच वर्षांसाठी आयपीएलच्या मुख्य प्रायोजकत्वाचे अधिकार एकूण 2190 कोटी रुपयांना मिळवले.
प्रत्येक वर्षी मिळणाऱ्या 440 कोटींपैकी अधिक रक्कम आठ संघांमध्ये समान वाटली जाते. त्यामुळे प्रत्येक संघाला या करारान्वये 27 कोटी 50 लाख रुपये मिळतात.