मुंबई – मनोज वाजपेयीने आतापर्यंतच्या करिअरमध्ये वेगवेगळे रोल केले आहेत. त्याने लीड रोल बरोबर सपोर्टिंग ऍक्टर म्हणूनही प्रेक्षकांवर छाप टाकली आहे. त्याने ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील आपली जबरदस्त ऍक्टिंग दाखवून दिली आहे. आता तो डिस्कव्हरी चॅनेलवर “सिक्रेट ऑफ सिनौली-डिस्कव्हरी ऑफ द सेंच्युरी’ या डॉक्युमेंटरीसाठी अँकर बनणार आहे.
तो आता 50 दिवसांसाठी अंडरग्राउंड होणार असल्याचेही समजले आहे. त्याने अलिकडेच “डिस्पॅच’ या आगामी सिनेमाचे शुटिंग सुरू केले आहे. या सिनेमाच्या सेटवर अगदी घरच्यासारखे वाटत असल्याचे त्याने एका पोस्टमध्ये म्हटले आहे. सध्या तो आणखी का सिनेमाची तयारी करतो आहे. त्या तयारीचा भाग म्हणूनच तो 50 दिवस स्वतःहून सर्व जगाशी संपर्क तोडून टाकणार आहे. अगदी करोनाच्या विलगीकरणाप्रमाणेच तो स्वतःला बंद करून घेणार आहे.
यातील 15 दिवस तो एक इनडोअर वर्कशॉप देखील करणार आहे. या वर्कशॉपमध्ये त्याच्या नव्या भूमिकेसाठी त्याला ट्रेनिंग दिले जाणार आहे. त्याच्या या नव्या सिनेमाबाबत अधिक तपशील मात्र उपलब्ध होऊ शकलेला नाही. दरम्यान तो “द फॅमिली मॅन 2′ ची तयारीही करतो आहे. या वेबसिरीजचा रिलीज पुढे ढकलण्यात आला आहे. आता या वेबसिरीजचा दुसरा भाग उन्हाळ्यामध्ये रिलीज केला जाणार आहे.