बिजींग – चीनच्या एका यानाने आज मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला. या कक्षात प्रवेश करणारे हे गेल्या दोन दिवसातले दुसरे यान आहे. दोनच दिवसांपुर्वी संयुक्त अरब अमिरातीच्या यानानेही या कक्षेत प्रवेश केला आहे.
चीनच्या या आधीच्या मंगळ मोहीमांमध्ये अपयश आल्याने या मोहिमेविषयी चीनने फार वाच्यता केली नव्हती. पण या यानाने मंगळाच्या कक्षेत यशस्वी प्रवेश केल्यानंतर त्याविषयीची माहिती आज अधिकृतपणे घोषित करण्यात आली आहे.
हे यान मंगळाच्या पृष्ठ भागावर उतरवण्याचा चीनचा प्रयत्न आहे. तथापि या कामाला किमान तीन महिन्यांचा अवधी लागले असे सांगण्यात येते. चीनचा हा प्रयत्न यशस्वी झाला तर मंगळाच्या पृष्ठभागावर यान उतरवण्याचा मान मिळवणारा तो जगातील दुसरा देश ठरणार आहे.
या आधी सन 1976 मध्ये अमेरिकेने मंगळावर यान उतरवण्यात पहिले यश मिळवले आहे. त्यानंतर अमेरिकेने मंगळावर आत्तापर्यंत आठ यशस्वी मोहीमा केल्या आहेत. तियानमेन 1 असे या चिनी यानाचे नाव असून त्या यानाने सहा महिन्यात 470 दशलक्ष किमीचा अंतरीक्षाचा प्रवास करून मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला आहे.