कासगंज – ज्या इसमावर पोलिस कॉन्स्टेबलची हत्या केल्याचा आरोप होता तो इसम आज पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला. एल्कपा असे ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. तो नागला धीमार गावचा रहिवासी होता. तो आपल्या भावाच्या बरोबर गावठी दारू विकण्याचा व्यवसाय करीत होता.
या आधी तो पोलिसांना गुंगारा देऊन पळण्यात यशस्वी झाला होता. पण तो काली नदीच्या किनारी एका ठिकाणी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या भागाची नाकेबंदी केली. त्यावेळी झालेल्या चकमकीत तो ठार झाला.
त्याच्या नागला धिमार गावातील दारू अड्ड्यावर छापा घालण्यासाठी एक पोलिस पथक गेले होते त्यावेळी एल्कपा आणि त्याच्या साथीदारांनी एका पोलिस कॉन्स्टेबलला बेदम मारहाण केली त्यात तो मरण पावला. तर त्यांच्या मारहाणीत एक पोलिस उपनिरीक्षक गंभीर जखमी झाला आहे. हा प्रकार मंगळावरी रात्री घडला होता.