बारामती (प्रतिनिधी) : बारामतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरण कार्यालया समोर वीजदर वाढीविरोधात वीज बिलाची होळी करत आंदोलन करण्यात आले.
यावेळी आघाडी सरकारच्या विरोधात आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत वीजबिल माफ करण्याची मागणी केली.