मुंबई : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे मागील दोन महिन्यांपासून आंदोलन सुरुच आहे. शेतकरी आंदोलनावर इंटरनॅशनल पॉपस्टार रिहाना आणि पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गने ट्विट केल्यानंतर शेतकरी आंदोलन आंतरराष्ट्र पातळीवर गाजले आहे. तर भारतात मोठ्या प्रमाणात यावरून वाद झाला. आता महाराष्ट्रातील एका कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांची बाजू घेणाऱ्या पर्यावरणवादी थनबर्गला आमंत्रण देण्यात आले.
राज्यात विद्रोही साहित्य संमेलननाचे आयोजन केले जात आहे. या संमेलनाचे निमंत्रण दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग हिला देण्यात आलं आहे. थनबर्गला निमंत्रण दिल्यामुळे या साहित्य संमेलनाची सगळीकडे चर्चा सुरु आहे.
विद्रोही साहित्य संमेलनात संविधानाच्या सन्मानार्थ विचारविनियम होणार आहे. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला तसेच शेतकऱ्यांना साथ देणाऱ्या विचारवंतांना या संमेलनाचे आमंत्रण दिले जाणार आहे. ग्रेटा थनबर्ग यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे त्यांनाही या संमेलनाचे निमंत्रण दिले आहे,” असे विद्रोही साहित्य संमेलनाचे सदस्य राजू देसले यांनी सांगितले.