पुणे – ‘माझा होशील ना’ ह्या झी मराठीवरील मालिकेमधला नव्या रंजक घडामोडींनी प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलेलं आहे. मालिकेत प्रत्येक आडवड्याला काहीना काही नवीन घडत असून, पुन्हा एकदा दादा ब्रह्मे आणि शशी बिराजदार हे कॅालेज काळातले जुने वैरी समोरासमोर येणार आहे.
शशी बिराजदार चं खरं नाव बब्या बिराजदार, पूर्वीचा गुंड आणि स्मगलिंगवाला, जो दादा ब्रह्मे सोबत एकाच कॅालेजात असतो, आणि तेव्हापासून हुशार दादा आणि गुंड बब्या ह्यांचं वैर असतं. त्यापायीच दादाने कॅापी करताना बब्याला पकडून दिलेलं असतं.
आदित्य आणि सई चा प्रवास आता लग्नाच्या दिशेने सुरु झालाय, सुयश शी सई ठरलेलं लग्न मोडावं ह्या हेतूने, सगळे मामा बिराजदारांकडे येतात, पण तिथेच एकमेकांचे जुने वैरी असणारे दादा ब्रह्मे आणि शशी उर्फ बब्या बिराजदार समोरासमोर येतात. आता ह्या जुन्या हाडवैऱ्यांमुळे सई आदित्यच्या लग्नात विघ्न तर येणार नाही ना? पहात रहा, माझा होशील ना रात्री ९.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.