नवी दिल्ली – केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकरी दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर केंद्र सरकारने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना थांबविण्यासाठी अभूतपूर्व व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, शेतकरी संघटना 6 फेब्रुवारीला देशव्यापी चक्का जाम आंदोलन करणार आहेत.
प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर दिल्ली पोलिसांनी आंदोलनस्थळांवर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. पोलिसांकडून गाझीपूर सीमा, टिकरी सीमा आणि सिंघू सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था केली जात आहे. आंदोलनकर्ते पुन्हा दिल्लीकडे ट्रॅक्टरआणू नये यासाठी सीमेवर मोठ्या प्रमाणात बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. तसेच, रस्त्यांवर खिळे ठोकण्यात आले आहेत. काटेरी ताराही लावण्यात आले आहेत. याशिवाय आर्मी मेरीट वर्कशॉपमधून दोन क्रेनही आणण्यात आल्या आहेत.
दरम्यान, शेतकरी संघटना 6 फेब्रुवारीला देशव्यापी चक्का जाम आंदोलन करणार आहेत. त्या आंदोलनानुसार संबंधित दिवशी तीन तासांसाठी (दुपारी 12 ते 3) देशभरातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग रोखले जाणार आहेत. आता शेतकऱ्यांच्या चक्का जाम आंदोलनामुळे देशभरातील वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे.