मेष : कामाची योग्य आखणी करून त्याप्रमाणे कामे पूर्ण करण्यावर भर राहील. मानसिक समाधान लाभेल.
वृषभ : व्यवसायात महत्त्वाची कामे हाती घ्याल. कामामुळे धावपळ वाढेल. भांडवलाची तरतूद करावी लागेल.
मिथुन : ओळखीतून नवीन कामे मिळतील. नोकरीत कंटाळवाणे काम संपेल. सलोख्याचे वातावरण राहील.
कर्क : इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याकडे कल राहील. बोलण्यापेक्षा कृतीवर भर दया.
सिंह : घरात माझे तेच खरे हा अट्टहास सोडा. मुलांकडून चांगली वार्ता कळेल. महिलांचा घरकामात वेळ जाईल.
कन्या : जीवनाचा आस्वाद घेण्याची उर्मी उफाळून येईल सबुरी ठेवा. व्यवसायात कर्तव्यपूर्तीला प्राधान्य दया.
तूळ : नवीन करार करण्यापूर्वी त्याचा भविष्यात काय परिणाम होईल याचा अंदाज घ्या.
वृश्चिक : नोकरीत कामाचा मनस्वी कंटाळा येईल. तसेच बदल करावासा वाटेल पण असे निर्णय घाईने घेऊ नका.
धनु : नवीन नोकरीत थोडा धीर धरावा. घरात पाहुण्यांची ये जा राहील. आप्तेष्ट यांचे भेटीचे योग येतील.
मकर : मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागेल. महिलांना मनमुराद खरेदीचा आनंद घेता येईल.
कुंभ : आशावादी दृष्टिकोन ठेवून कामाची आखणी करा. व्यवसायात व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून कामे घ्या.
मीन : उधार उसनवार शक्यतो टाळा. पूर्वी केलेल्या कामाचे आर्थिक स्वरूपात श्रेय मिळेल.