आजचे भविष्य (शुक्रवार,२२ जानेवारी २०२१)

मेष :  कामाची योग्य आखणी करून त्याप्रमाणे कामे पूर्ण करण्यावर भर राहील. मानसिक समाधान लाभेल.

वृषभ : व्यवसायात महत्त्वाची कामे हाती घ्याल. कामामुळे धावपळ वाढेल. भांडवलाची तरतूद करावी लागेल.

मिथुन : ओळखीतून नवीन कामे मिळतील. नोकरीत कंटाळवाणे काम संपेल. सलोख्याचे वातावरण राहील.

कर्क : इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याकडे कल राहील. बोलण्यापेक्षा कृतीवर भर दया.

सिंह : घरात माझे तेच खरे हा अट्टहास सोडा. मुलांकडून चांगली वार्ता कळेल. महिलांचा घरकामात वेळ जाईल.

कन्या : जीवनाचा आस्वाद घेण्याची उर्मी उफाळून येईल सबुरी ठेवा. व्यवसायात कर्तव्यपूर्तीला प्राधान्य दया.

तूळ : नवीन करार करण्यापूर्वी त्याचा भविष्यात काय परिणाम होईल याचा अंदाज घ्या.

वृश्‍चिक :  नोकरीत कामाचा मनस्वी कंटाळा येईल. तसेच बदल करावासा वाटेल पण असे निर्णय घाईने घेऊ नका.

धनु :  नवीन नोकरीत थोडा धीर धरावा. घरात पाहुण्यांची ये जा राहील. आप्तेष्ट यांचे भेटीचे योग येतील.

मकर :  मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागेल. महिलांना मनमुराद खरेदीचा आनंद घेता येईल.

कुंभ :  आशावादी दृष्टिकोन ठेवून कामाची आखणी करा. व्यवसायात व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून कामे घ्या.

मीन :  उधार उसनवार शक्‍यतो टाळा. पूर्वी केलेल्या कामाचे आर्थिक स्वरूपात श्रेय मिळेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.