कवठे – चांदक, ता. वाई येथील ग्रामपंचायत निवडणुकीत चंद्रेश्वर वॉर्ड क्र. 1 मधील तिन्ही पॅनेलच्या उमेदवार अलका अशोक सपकाळ, शोभा वसंत भिलारे व सोनाली कालिदास सपकाळ यांना प्रत्येकी 168 मते मिळाली.
त्यामुळे श्रेयश मानारे या बालकाच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात येऊन, राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रणित पॅनेलच्या सोनाली सपकाळ यांना विजयी घोषित करण्यात आले. गावातील सात जागांपैकी पाच जागांवर राष्ट्रवादीप्रणित पॅनेलचे व भाजपप्रणित पॅनेलचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत.