बॅंकॉक – अमली पदार्थाचे सेवन केल्यानंतर (मेटामेफेटामाईन) कार चालवत असताना, “त्याने’ एक रॉंग टर्न घेतला आणि त्याची कार चक्क विमानतळाच्या धावपट्टीवर धावू लागली. मग त्या विमानतळावर एकच धांदल उडाली कारण नुकत्याच लॅंड झालेल्या एका विमानाच्या शेजारीच ही कार वेगाने फिरताना दिसत होती. अखेरीस विमानतळ कर्मचायांनी या कारचालकाला पकडले आणि त्याला कारसह विमानतळाबाहेर पिटाळले. अन्यथा एक मोठा अपघात झाला असता.
ही घटना बॅंकॉकच्या सुवर्णभूमी विमानतळावर मंगळवारी घडली. एका विमानतळ कर्मचाऱ्याने कार धावपट्टीवर फिरत असल्याचा व्हिडीओ शूट केला आणि तो समाज माध्यमांमध्ये वेगाने व्हायरलही झाला. प्रतिपत मसाकुल असे या काअरचालकाचे नाव असून बॅंकॉक विमानतळ पोलिसांनी त्याला प्रतिबंधित क्षेत्रात वाहन चालवल्याबद्दल अटक केली आहे. तसेच त्याच्या कारमध्येही मेटामेफेटामाईन हे अमली द्रव्य आढळल्याने आणखी एक गुन्हा नोंद केला आहे.
งามไส้ บริษัทหมื่นล้าน AOT ปล่อยให้ รถ ที่ไม่ได้รับอนุญาต
บุกเข้าไปวิ่งพล่านข้างเครื่องบิน
นี่คือ safety & security breach ที่ร้ายแรงมากครับ #สาระการบินน่ารู้ pic.twitter.com/MwkPNHawDe
— คนไทยไม่ยอม YNWA (@Khongsak) January 14, 2021
यासंबंधीचे वृत्त “थायगेर’ या प्रसारमाध्यमाने दिल्यानंतर अल्पावधीत हा व्हिडीओ व्हायरल झाला. या निमित्ताने सुवर्णभूमी विमानतळाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.