मुंबई – आपल्या डोळ्यांच्या नजरेने सर्वांना घायळ करणारी आणि रातोरात प्रसिद्धी मिळविलेली दाक्षिणात्य अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रिया सध्या तिच्या फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे.
प्रिया नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती वेगवेगळ फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करत असते. नुकतेच तिचे नवीन म्यूजिक ‘लाडी लाडी’ व्हिडीओ आला आहे. यामध्ये ती दमकेदार डान्स करताना दिसत आहे. हे गाणं तेलगू भाषेतील असून काहीच तासात या गाण्याला लाखोंच्या घरात लाईक मिळाले आहे.
View this post on Instagram
या गाण्यात तिच्यासोबत रोहित नंदन आहे. तर हे गाणं प्रिया आणि राहूल सिपलिगंजने गायले आहे. श्री चरण पकाला यांनी या गाण्याला म्युजिक दिले आहे. लवकरच प्रिया ‘श्रीदेवी बंगला’ आणि ‘लव्ह हॅकर्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.