मुंबई – बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती काही दिवसांपूर्वी अचानक खालावल्याने ते सेटवरच कोसळले होते. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित मसुरीमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे शूटिंग चालू होते.
View this post on Instagram
यावेळी, फूड पॉयझनिंगमुळे त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांची प्रकृती खराब झाली होती. मात्र आता त्यांची तब्येत सुधारली असून त्यांनी पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात केली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट जम्मू-काश्मीरमधील पंडितांच्या हत्याकांड आणि निवर्सनावर असणार आहे. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती यांच्यासह अनुपम खेर आणि पुनीत इस्सरही असणार आहेत.