पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी प्राधिकर उभारण्यात येत असलेल्या ग.दि. माडगूळकर या नाट्यगृहाच्या बांधकामाची सिने अभिनेते भरत जाधव आणि नाट्य अभिनेते जयराज नायर यांनी रविवारी (दि.10) भेट देत, पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत विरोधी पक्षनेते राजू मिसाळ होते.
या पाहणीदरम्यान नाट्यगृहातील प्रस्तावित सोयी-सुविधांची माहिती घेत, राज्यातील उत्तम नाट्यगृहांमध्ये या नाट्यगृहाची भर पडणार आहे, असे गौरवोद्गार भरत जाधव यांनी काढले.
या नाट्यगृहात केवळ नाट्यप्रयोगच नव्हे, तर नाट्यप्रयोगापूर्वी कलाकारांची एकत्रित बैठक व्हावी, यासाठी कॉन्फरन्स हॉलचे काम सुरु आहे.
याशिवाय मर्यादित प्रेक्षकांच्या उपस्थितीतील नाट्यप्रयोगासाठी आटोपशीर मिनी थिएटर, रेस्टॉरंट अशा विविध सोयी-सुविधांचा आढावा घेतला.