मुंबई – भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तक्रार थेट निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती लपविल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. याबाबत त्यांनी ट्विटरवरून सांगितले आहे.
निवडणूक प्रतिज्ञापत्रात कोर्लई (अलिबाग) येथील 19 बंगल्यांची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेली नाही. याविरोधात मी निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली. ठाकरे यांनी 21/03/2014 रोजी अन्वय नाईक कडून जमीन व बंगले खरेदी केले. ते 12/11/2020 रोजी ठाकरे यांच्या नावावर करण्यात आले, असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे.
उद्धव ठाकरेंचे 19 बंगले, प्रताप सरनाईकांची 78 एकर जमीन ED चा ताब्यात, संजय राऊत प्रवीण राऊतांचे पार्टनर महाकाली मंदिर/गुंफाची जमीन बिल्डरला, बीएमसीनी दहिसरचा ₹2.55 करोडचा जागेचे बिल्डरला ₹349 करोड दिले. 5000 खाटांचा ₹12,000 कोटीचा कोवीड हॉस्पिटल घोटाळा आणखी किती पुरावे हवेत, असा सवालही किरीट सोमय्यांनी विचारला आहे.
श्री उद्धव ठाकरेचे 19 बंगलो
प्रताप सरनाईकचा 78 एकर जमीन ED चा ताब्यात
संजय राऊत प्रवीण राऊतचे पार्टनर
महाकाली मंदिर/गुंफाची जमीन बिल्डरला
BMC नी दहिसरचा ₹2.55 करोडचा जागेचे बिल्डरला ₹349 करोड दिले
5000 खाटांचा ₹12,000 कोटीचा कोवीड hospital घोटाळा
आणखी किती पुरावे हवेत
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 11, 2021
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीकडून नोटीस आल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. त्यातच सोमय्या यांच्या विरोधात शिवसेना अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बेफाट आरोप केले जात असून त्यातून काही निष्पन्न होणार नाही असे म्हटले आहे. तर याचवेळी त्यांनी आरोप सिद्ध झाले नाहीत तर जोड्याने मारणार असल्याचे म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला आहे.