राणा दग्गूबाती आणि पुलकित सम्राट यांचे लीड रोल असलेला “हाथी मेरे साथी’ इतक्यात रिलीज होणार नाही. या सिनेमाचे रिलीज होणे थोडे पुढे ढकलले गेले आहे. मार्च महिन्यात हा सिनेमा थिएटरवर रिलीज होणार आहे.
एका वेळेला तीन भाषांमध्ये “हाथी मेरे साथी’ रिलीज केला जाणार आहे. जानेवारी महिन्यात मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज होण्याची अपेक्षा होती. “हाथी मेरे साथी’ ग्लोबल वॉर्मिंग आणि जंगलांचा होत असलेला ऱ्हास यावर केंद्रित आहे. वन्यजीव आणि माणसाच्यातल्या संघर्षाचाही या सिनेमात आढावा घेतलेला असेल, “हाथी मेरे साथी’ च्या हिंदी आवृत्तीमध्ये जोया हुसेन, श्रेया पिळगावकर, पारस अरोरा, अंकित समर आणि टिनू आनंद हे देखील असणार आहेत.
नाव “हाथी मेरे साथी’ असल्यामुळे अर्थातच सिनेमात हत्तींबरोबरच्या सहासी दृश्यांचाही समावेश असेल. “हाथी मेरे साथी’ नावाचा राजेश खन्ना यांचा सिनेमा सुपरहिट झाला होता. पण नवीन “हाथी मेरे साथी’ हा त्या सिनेमाचा रिमेक असणार नाही. तर त्यामध्ये पूर्ण नवीन वेगळी गोष्ट बघायला मिळेल.