मुंबई – शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत काही दिवसांपूर्वी ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. तर आता पुन्हा वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावलं असून 11 जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे.
दरम्यान, यापूर्वी त्यांची तीन तासांहून अधिक वेळ त्यांची चौकशी करण्यात आली होती. वर्षा राऊत यांना ईडीकडून 5 जानेवारीला हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. पीएमसी बॅंकेतील कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी वर्षा राऊत यांना 29 डिसेंबर रोजी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर वर्षा राऊत यांनी 5 जानेवारीपर्यंत मुदतवाढ मागितली होती. वर्षा राऊत यांना पीएमसी बॅंकेतील खात्याशी संबंधित कागदपत्रं घेऊन कार्यालयात येण्यास सांगितले आहे.