पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांना 18 जानेवारीपर्यंत भरता येतील.
राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. यापूर्वी मंडळाने ऑनलाइन अर्जांसाठी 15 डिसेंबर ते 4 जानेवारी अशी मुदत दिली होती.