मेष : कामात नवीन पद्धतीची योजना कार्यान्वित करण्याचा मानस असेल. कामांना योग्य तो प्रतिसाद मिळेल.
वृषभ : सहकारी कामात मदतीचे आश्वासन देतील. नोकरीत प्रशिक्षणासाठी तुमची निवड होईल.
मिथुन :कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचे ते आधीच ठरवा. जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रित करा.
कर्क : महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांवर सोपवलीत तर नेहमीचे कामं हलके होईल.
सिंह : काही व्यक्त मतलबापुरती तुमची खुशामत करतील. नोकरीत सबुरीचे धोरण ठेवा.
कन्या : कामाचा अनुभव चांगला येईल. नोकरीत सर्वांगीण प्रगती होण्याच्या दृष्टीने एखादी महत्त्वाची संधी मिळेल.
तूळ : नवीन नोकरीच्या प्रयत्नात यश मिळेल. निर्णयात तुमची भूमिका राहील. तरुणांचे विवाह जमतील.
वृश्चिक : नको त्या कामात बराच वेळ जाईल. बोलताना इतरांची मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्या.
धनु : नोकरीत वेगळया पद्धतीचे कामं मिळेल त्यामुळे उत्साही रहाल. नवीन ओळखी होतील.
मकर : जुनी कामे मार्गी लागतील. वरिष्ठांच्या बदलत्या धोरणामुळे चिडचिड होईल.
कुंभ : नवीन प्रकल्प हाती घ्याल. खेळत्या भांडवलाची तरतूद करून ठेवाल. नोकरीत वरिष्ठांच्या बऱ्याच अपेक्षा असतील.
मीन : कष्ट करण्याची तुमची तयारी असेल. नोकरीत बदली किंवा बदल समजून घेण्यासाठी वेळ द्यावा लागेल.