पुणे : राजकीय टिकाटिप्पनी आणि कोटया करत सर्वपक्षीय गटनेत्यांनी महापालिकेचे नवनियुक्त सभागृह नेते गणेश बीडकर यांच्या मुख्यसभेत अनोखे अभिनंदन केले.
यावेळी सर्वच पक्षांच्या गटनेत्यांनी राजकीय चिमटे काढत शुभेच्छा दिल्या. तर बीडकर यांनीही आपल्या खास शैलित हिंदी शायरी सादर करत विरोधकांच्या शुभेच्छा स्विकारल्या.
त्यामुळे तब्बल आठ महिन्यानंतर पहिल्यांदाच महापालिकेच्या सभागृहात काही काळ तणावमुक्त वातावरण दिसून आले.
मुख्यसभेत बीडकर यांच्या नियुक्तीचे अभिनंदन करण्यात आल्यानंतर, बिडकर या पूर्वी विधानसभा निवडणूकीला इच्छूक असल्याचा धागा पकडत, बीडकर यांच्या रूपाने भाजपने सभागृहनेतेपदी चांगल्या मानसाला संधी दिल्याचे सांगत, पालिकेच्या सभागृहत ते आहेतच; पण ते वरच्या सभागृहात जायला हवेत अशी कोटी शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी केली. तसेच नेहमी सर्वांना सोबत घेऊन व आपल्या अनुभवाचा फायदा घेत ते सभागृहाचे कामकाज आणख्या चांगल्या पध्दतीने करतील अशी अपेक्षा सुतार यांनी यावेळी व्यक्त केली.
बीडकर यांनी पालिकेत मोठया पदांवर काम केलं आहे. चार वर्षे ते सभागृहात नव्हते. त्यांना आता पक्षाने महापालिका निवडणूकीच्या तोंडावर शेवटच्या ओव्हरमध्ये संधी दिली आहे. त्यांना खुप रन्स करायचे असायचे असून ते पक्षाला सुगीचे दिवस आणतील अशी टिप्पनी करत मनसे गटनेते वसंत मोरे यांनी बीडकर यांना चिमटा काढला.
तर नवनियुक्त सभागृहनेते गणेश बीडकर मुख्यसभेत सर्व पक्षांच्या सदस्यांना समान न्याय देतील, सभागृहाचे कामकाज आपल्या अनुभवाच्या जोरावर चांगल्या पध्दतीने चालवतील अशी अपेक्षा महापालिकेतील विरोधीपक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी केली.
या गटनेत्यांच्या शुभेच्छांना बीडकर यांनीनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले. यावेळी बीडकर यांनी शेरोशायरी करत, सर्व पक्षीयांच्या वाह..वा मिळविली
ना मै गिरा , और ना उम्मिदो के मिनार गिरे…! पर लोग मुझे गिराने मे कई बार गिरे.. सवाल जहर का नही था वो तो मै पी गया, तकलीफ लोगो को हुई , जब मै जी गया..!
हा शेर सादर अभिनंदनाचा स्विकार केला. तसेच
पक्षाने मला जाणीवपूर्वक शेवटच्या वर्षात मोठी जबाबदारी दिली त्यांचे आभार. मी जबाबदरीचे भान ठेवून काम करेन असे आश्वासन सर्वपक्षीय सभासदांना दिले.