अॅडलेड – भारताचा वेगवान गोलंदाज महंमद शमी याला दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील उर्वरित तीन कसोटी सामन्यांतून माघार घ्यावी लागत आहे.
शमीच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याने निष्पन्न झाले असून त्याला पूर्ण तंदुरूस्त होण्यासाठी बराच कालावधी लागणार असल्याने त्याला उर्वरित तीनही कसोटीतून वगळण्यात आले आहे.
ऍडलेड येथे शनिवारी झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात फलंदाजी करताना पॅट कमिन्सचा उसळता चेंडू शमीच्या उजव्या मनगटावर लागला होता. त्याच्या मनगटाचे स्कॅनिंग केल्यावर फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले.