मेष : महिलांचा सकारात्मक दृष्टीकोन पुढे जाण्यास प्रवृत्त करेल. तरूणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.
वृषभ : पाहुण्यांची ये-जा राहील. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या भेटीगाठी होतील. तरूणांना स्थिरता लाभेल.
मिथुन : विद्यार्थ्यांनी नशिबांवर हवाला ठेवू नये. कलाकार, खेळाडूंना त्यांचे क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल.
कर्क : एकाग्रतेने त्यांच्या क्षेत्रात कामगिरी करावी लागेल. नोकरीत धावपळ संपून श्रेय देणारे काम मिळेल.
सिंह : प्रकृतीची काळजी घ्या. तरूणांनी अतिधाडस करू नये. महिलांनी दगदग धावपळ कमी करावी.
कन्या : तरूणांचे विवाह ठरतील. महिलांना मनाजोगता खरेदीचा आनंद घेता येईल. प्रकृतीमान सुधारेल.
तूळ : विद्यार्थ्यांना सुयोग्य मार्गदर्शनाचा लाभ होईल. जमाखर्चाची बाजू तात्पुरती समसमान राहील.
वृश्चिक : घरात व्यक्तिंचे समाधान करणे कठीण जाईल. नोकरीत तुमचे काम वेळेत व बिनचूक करा.
धनु : जुनी येणी वसूल झाल्याने पैशाची चणचण कमी जाणवेल आत्मिक समाधान लाभेल. पैशाची चिंता मिटेल.
मकर : मुलांच्या प्रगतीबाबत चांगली वार्ता कळेल. महिलांना हौसमौज करता येईल. आप्तेष्टांची भेट होईल.
कुंभ : घरात कुटुंबासह छोटी सहल काढण्याचा कार्यक्रम ठरेल. कमी श्रमात जास्त यश मिळेल.
मीन : घरात प्रियजनांच्या जीवनात सुखद प्रसंगाची नोंदी होईल. आवडत्या व्यक्तिंच्या भेटीने आनंद मिळेल.